गणेशचतुर्थीच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वजण खूप आनंदात गणेशाचा उत्सव साजरा करण्यात मग्न असलाच आणि सर्वांकडे आज मोदकांचे विविध प्रकार केलेले असतील. गणपती हा बुद्धीचा अधिष्ठाता व विघ्न हरण करणारा मानला जातो. म्हणूनच आपणाला कुठलीही विद्या प्राप्त करून घ्यायची असेल तर गणेशाची प्रार्थना करा असे सांगितले जाते.
ह्या ५ दिवसात गणेशतत्त्व पृथ्वीवर सूक्ष्मस्वरूपात अस्तित्वात असते त्यामुळे तुम्ही सर्वांनी गणपतीस्तोत्रचे शक्य असेल तर २१ पाठ करावेत. किंवा ओम गं गणपतेय नमः हा मंत्र म्हणावा. रोज थोडावेळ तरी अभ्यासासाठी राखून ठेवा व झालेल्या सिलॅबस ची उजळणी करा.
श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।।
तृतीयं कृष्णपिङ्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।।
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।
इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।